Sunday, July 6, 2025
Homeब्रेकिंगजुगार, मटका जोमात; पोलीस प्रशासन कोमात

जुगार, मटका जोमात; पोलीस प्रशासन कोमात

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कडेगाव शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना उत आले आहे. बेकायदा मटका, जुगार, दारू, गुटखा, सावकारी गौण खनिज तस्करी आदी अवैध धंदे राजरोसपणे जोमात तर पोलीस प्रशासन कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक पोलीस प्रशासन आणि अवैध धंदे यांचे लागेबांधे असल्याची चर्चा परिसरात आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालून अवैध धंद्याना चाप लावावा अशी मागणी होऊ लागली आहे.



कडेगाव तालुक्यात कडेगाव व चिंचणी वांगी अशी दोन पोलीस ठाणी आहेत. मात्र फोफावलेल्या मटका आणि जुगार अड्यांवर पोलिसांचे अंकुश नसल्याचे दिसून येते. शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे खुलेआम सुरु आहेत. वाढत्या अवैध धंद्यामुळे तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात अवैध धंदे खुलेआम सुरु असताना पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त ^ जात आहे.

कडेगावसह तालुक्यात ५५ गावांचा समावेश आहे. कडेगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे ये जा करणाऱ्या लोकांची गर्दी मोठी असते. तर शुक्रवारी आठवडा बाजार असतो. या बाजारात भुरट्या चोरांची संख्या वाढली असून किरकोळ चोरीचे प्रमाण वाढले आहे. तर गेली काहीदिवस झाले शेती अवजारांच्या साहित्याची चोरीही वाढली आहे. सक्रिय चोरटी टोळी राजरोसपणे फिरत आहे. मात्र पोलीस पराशासनाकडून याकडे कानाडोळा केला जात आहे. तर शहरासह तालुक्यात सर्वत्र खुलेआम गुटखा, मावा, सुपारी विक्री केली जात आहे. मोठं मोठे व्यापाऱ्यांचा यामध्ये समावेश असून लाखो रुपयांची दररोज उलाढाल यातून होत आहे. तालुक्यात बेकायदा दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -