ताजी बातमी ऑनलाईन टीम
बॉलिवूडची दिवा अर्थात मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोराच्या (Malaika Arora) सौंदर्याची, फिटनेसची जगभरात चर्चा आहे. मलायका जरी चित्रपटांपासून दूर असली तरी लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी ती कोणतीही कसर । सोडत नाही. वयाच्या 48 व्या वर्षीही ती इतकी फिट आणि बोल्ड दिसते की ती तरुण अभिनेत्रींनाही सहज मात देऊ शकेल.

मलायकाच्या जगभरातील फॅन फॉलोईंगची यादीही खूप मोठी झाली आहे, जे तिच्या एका झलकसाठी आतुर आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मलायकाने तिच्या लेटेस्ट लूकची झलक दाखवली आहे. मलायकाने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिकिनीतील (Bikini) तिचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. अवघ्या पाच तासांत या फोटोला जवळपास अडीच लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.