Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगMLC Election 2022 : देवेंद्र फडणवीसांचा डंका; महाविकास आघाडीला पुन्हा धक्का

MLC Election 2022 : देवेंद्र फडणवीसांचा डंका; महाविकास आघाडीला पुन्हा धक्का

ताजी बातमी ऑनलाईन टीम

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या बनलेल्या विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकीत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारली. अपुरे संख्याबळ असतानाही फडणवीस यांनी आपला करिष्मा दाखवून अटीतटीच्या सामन्यात भाजपचा पाचवा उमेदवार निवडून आणला आणि राज्यसभेपाठोपाठ आपल्या नव्या टेक्निकचा चमत्कार दाखवला. काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला. भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड, शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमश्या पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईकनिंबाळकर आणि एकनाथ खडसे, काँग्रेसचे भाई जगताप हे विजयी झाले.



दहा जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात होते. महाविकास आघाडीने सहा तर भाजपने पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विधान परिषदेचे विद्यमान सभापती रामराजे नाईक-निंबाळकर तसेच भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे पहिल्या फेरीतच निवडून आले. त्याचबरोबर भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, उमा खापरे, राम शिंदे व श्रीकांत भारतीय हे पहिल्या फेरीत निवडून आले. शिवसेनेचे सचिन अहिर व आमश्या पाडवी पहिल्या फेरीत निवडून आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -