ताजी बातमी ऑनलाईन टीम
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या 10 जागांचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. भाजपाने (BJP) विधान परिषदेत निवडणुकीत देखील महाविकास आघाडीला दमदार टक्कर दिली आहे. या विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. या निवडणुकीमध्ये भाजपच्या हाती संख्याबळ नसताना सुद्धा भाजपने विजय मिळवला आहे. त्यामुळे या निवडणुकीतही देवेंद्र फडणवीस यांची रणनीती यशस्वी ठरली आहे.
मतमोजणीतील पहिल्या टप्प्यातच भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीमध्ये भाजपचे राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे विजयी झाले आहेत. शिवेसेनेच्या आमशा पाडवी आणि सचिन अहीर विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे हे देखील विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीचे एकूण 6 उमेदवार विजयी झाले तर भाजपचे 5 उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला असून दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करता आला नाही. या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या भाई जगताप यांचा पराभव झाला आहे.
विधानपरिषदेतील विजयी उमेदवार आणि मतं –
भाजप –
प्रविण दरेकर – 26 मतं
राम शिंदे – 26 मतं
श्रीकांत भारतीय – 26 मतं
उमा खापरे – 26 मतं
प्रसाद लाड – 26 मतं