ताजी बातमी ऑनलाईन टीम
नंदकुमार पवार वय वर्षे 52 राहणार म्हैसाळ, राजेंद्र बन्ने वय वर्षे 50 राहणार नरवाड,अनिल बन्ने वय वर्षे 35 राहणार नरवाड, खंडेराव शिंदे वय वर्षे 37 राहणार म्हैसाळ, डॉ तात्यासो चौगुले वय वर्षे 50 राहणार म्हैसाळ,शैलेश धुमाळ वय वर्षे 56 राहणार म्हैसाळ,प्रकाश पार वय वर्षे 45 राहणार बेडग,संजय बांगडी वय वर्षे 51 राहणार म्हैसाळ,अनिल बोराडे वय वर्षे 48 राहणार म्हैसाळ, पांडुरंग घोरपडे वय वर्षे 56 राहणार म्हैसाळ,शिवाजी कोरे वय वर्षे 65 राहणार म्हैसाळ,रेखा चौगुले वय वर्षे 45 राहणार म्हैसाळ अशी अटक केलेल्या ची नावे आहेत.त्याच्याशिवाय आशु धुमाळ,अनाजी खरात,शामगोंडा पाटील,सतीश शिंदे,शिवाजी खोत,गणेश बामणे,शुभदा कांबळे,विजय सुतार, नंदकुमार धुमाळ,राजेश होटकर,अण्णासो पाटील, नरेंद्र शिंदे,महादेव संकपाळ यांच्यावरील मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पत्रकाराशी बोलताना पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम म्हणाले मृत पोपट वनमोरे आणि माणिक वनमोरे यांनी मृत्यूपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सर्व संशयिताची नावे आहे.वनमोरे कुटुंबातील 9 जणांनी कर्जबाजारीपणामुळे कंटाळून सामुहिक आत्महत्या केली आहे.त्यांनी कश्यासाठी कर्ज घेतले होते.कोणाकडून घेतले होते तसेच किती रुपयांचे कर्ज घेतले होते.यांचा तपास सुरू आहे.त्यांनी कर्ज घेतलेल्या रक्कमेचे काय केले यांचाही तपास पोलिस करीत आहेत.जादूटोणा की गुप्तधन यासाठी पैशाचा वापर केला आहे.तसाच हा तपास पोलिस उपअधीक्षक अशोक विरकर यांयाकडे दिला असल्याचे सांगितले.