Monday, July 7, 2025
Homeब्रेकिंगआपल्यासोबत 40 आमदार असल्याचा एकनाथ शिंदे यांचा दावा, वेगळा गट स्थापन करण्याची...

आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा एकनाथ शिंदे यांचा दावा, वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता

ताजी बातमी ऑनलाईन टीम

विधान परिषद निवडणुकीनंतर राज्यातील उद्धव ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. शिवेसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे यांचा बंड शमवण्यासाठी शिवसेनेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांनी मुख्यमंत्र्याचा निरोप घेऊन सुरतमध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसमोर 4 अटी ठेवल्याची माहिती मिळाली आहे.



एकनाथ शिंदे यांनी सांगितले, की शिवसेनेने भाजपसोबत युती करावी. आपण शिवसेनेतच राहणार आहे. शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी तोडावी. आपण काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांवर नाराज असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. भाजपसोबत शिवसेनेने सरकार स्थापन करण्याची एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. आता एकनाथ शिंदे यांनी ठेवलेल्या अटींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सोमवारी विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नॉट रिचेबल होते. त्यांच्यासोबत शिवेसेनेचे जवळपास 25 आमदार आहेत. हे सर्व आमदार गुजरातच्या सुरत शहरातील दी ग्रँड भगवती हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. तसेच ते भाजपच्या संपर्कात आहेत. शिंदेनी पुकारलेल्या या बंडामुळे माहाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. या संदर्भातील सर्व घडामोडींवर या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आपण नजर ठेवणार आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -