ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर ; जिल्ह्यात यावर्षी एकापेक्षा जास्त वेळा पूरस्थितीस तोंड द्यावे लागेल, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला सादर केला. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ऑगस्ट महिन्यानंतरच होतील, अशी शक्यता आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिकांसह ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया राबविली जात आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आरक्षणासह प्रभाग रचना पूर्ण झाली आहे. मतदार यादीही तयार करण्याचे काम सुरू आहे.
या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आवश्यक तयारी पूर्ण होताच निवडणूक घेण्याचा आयोगाचा विचार आहे. मात्र, याच कालावधीत पाऊस असल्याने आयोगाने सर्व जिल्हा प्रशासनाकडून गेल्या पाच वर्षांतील नैसर्गिक आपत्तींचा अहवाल मागवला होता.