ताजी बातमी ऑनलाईन टीम
शिवसेनेत माजलेला बंडाळी नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी । त्यांनी एकनाथ शिंदेंसह गेलेल्या आमदारांवर अप्रत्यक्षरित्या टीका करत माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल, तर या पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, असे भावनिक विधान त्यांनी यावेळी केले.
विधान परिषद निवडणुकीनंतरच्या घडामोडींमुळे राज्यात उद्भवलेल्या राजकीय पेचामुळे जनतेच्या मनात गेल्या दोन दिवसांपासून संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले होते. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मला पदाचा किंवा सत्तेचा मोह नाही. त्या आमदारांनी त्यांचे मत समोर येत सांगावे, सूरतमध्ये जाऊन त्यांना हे सांगण्याची गरज काय? या संवादानंतर आपण वर्षावरून मातोश्रीवर जाणार आहे. त्यांच्यापैकी एकानेही सांगितले तर मी मुख्यामंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, असे स्पष्ट केले.