Sunday, July 6, 2025
Homeब्रेकिंगखासगी कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून नवीन कायदा लागू!

खासगी कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून नवीन कायदा लागू!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सरकार पुढील महिन्यापासून म्हणजेच १ जुलैपासून नवीन वेतन संहिता लागू करण्याच्या तयारीत आहे. तुम्हीही खाजगी नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण या नवीन नियमांचा परिणाम खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे हातातील पगार कमी होणार आहे.



पण तुमचा निवृत्ती लाभ वाढणार आहे. नवीन कामगार संहितेच्या अंमलबजावणीसह, कर्मचाऱ्यांना फायदे आणि तोटे दोन्ही असतील. बातमीनुसार, नवीन वेतन संहिता 2019 हा 1 जुलैपासून लागू होणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याच्या CTC मध्ये मूळ वेतन, HRA, PF आणि ग्रॅच्युइटी सारखे सेवानिवृत्तीचे फायदे आणि इतर भत्ते असतात. जे आता बदलणार आहे.


सध्याच्या रचनेत मूळ वेतन कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 30 ते 40 टक्क्यांपर्यंत आहे. याशिवाय पेन्शन भत्ता, एचआरए, पीएफ इ. या आधारावर तुमच्या पगारातून पीएफ कापला जातो. मात्र आता नव्या रचनेनुसार मूळ वेतन सीटीसीच्या ५० टक्के असायला हवे. याचा थेट परिणाम तुमच्या पीएफ आणि ग्रॅच्युइटीवर होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -