ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्यभरातील इतर विद्यापीठाप्रमाणे शिवाजी विद्यापीठातील परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पध्दतीने घ्या, या मागणीसाठी बुधवारी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. यावर कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी विद्यापीठ अधिकार मंडळाच्या बैठकीत चर्चा करून विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पध्दतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुलगुरू यांचे आभार मानत विद्यापीठ निर्णयाचे स्वागत केले. शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा कोरोना कालावधीमध्ये ऑनलाईन पध्दतीने होत होत्या.
परंतू कोरोनानंतर परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घ्याव्या असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने ऑफलाईन पध्दतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. परंतू विद्यार्थ्यांना या निर्णयाला विरोध करीत ऑफलाईन एमसीक्यू पध्दतीने परीक्षा घ्यावी या मागणीसाठी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर केले. यावर विद्यार्थी हिताचा निर्णय घेत कुलगुरू डॉ. शिर्के यांनी अधिकार मंडळाशी चर्चा केली. या चर्चेमध्ये दिवसभर उलट-सुलट चर्चा झाली. परंतू अंतिम निर्णय विद्यार्थी हिताचा निर्णय घेवून विद्यापीठ परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पध्दतीने घेण्यात निर्णय घेतला आहे.
विद्यापीठ परीक्षा एमसीक्यू पध्दतीने होणार
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -