ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असता आणि महाविकास आघाडी सरकार पडण्याचे सावट निर्माण झाले असता एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: अजित पवार यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोना लागण झाली होती. त्यांच्या पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.
अजित पवार यांनी ट्वीट करत कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, ‘काल मी कोरोनाची चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.’