Monday, July 28, 2025
Homeमनोरंजनअभिनेत्री जैकलीन फर्नाडिसची 'ईडी'कडून चौकशी

अभिनेत्री जैकलीन फर्नाडिसची ‘ईडी’कडून चौकशी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर याच्याशी निकटचे संबंध असल्याचा आरोप झालेली चित्रपट अभिनेत्री जैकलीन फर्नांडिस हिने सोमवारी सक्तवसुली संचलनालयासमोर (ईडी) हजर राहत आपला जबाब नोंदविला. तिहार तुरुंगात बसून एका उद्योगपतीकडून दोनशे कोटी रुपये वसूल केल्याचा गंभीर आरोप सूकेश याच्यावर आहे.



याआधीही सुकेशसोबत असलेल्या संबंधांच्या अनुषंगाने ‘ईडी’ने जॅकलीन फर्नाडिस व नोरा फतेही यांची चौकशी केली होती. सुकेशने वरील दोन्ही अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्याचे ईडीच्या तपासात स्पष्ट झाले होते. हा खुलासा झाल्यानंतर ईडीने जॅकलीनची सात कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. सुकेश चंद्रशेखरची महिला मित्र पिंकी ईरानी हिने सुकेशची भेट जॅकलीनसोबत घालून दिली होती. सुकेशने पिंकीच्या मदतीनेच जॅकलीनला महागड्या भेटवस्तू पाठवून दिल्याचे
‘ईडी’च्या तपासात स्पष्ट झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -