Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंग4 मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू तर अनेक जण अडकल्याची भीती!

4 मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू तर अनेक जण अडकल्याची भीती!

पावसाला (Mumbai Rain) आता कुठे सुरुवात नाही झाली तर मुंबईमध्ये झाडं कोसळल्याच्या (Tree Collapse), घर कोसळल्याच्या (Home Collapse), इमारत किंवा इमारतीचा काही भाग कोसळल्याच्या (Building Collapse) घटनांना सुरुवात झाली आहे. अशामध्ये मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये चार मजली इमारत कोसळल्याची (Kurla Building Collapse) घटना समोर आली आहे. कुर्ला पूर्व भागातील नाईकनगर (Naiknagar) परिसरात चार मजली इमारत सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर ढिगाऱ्याखाली 20-25 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन (Fir Brigade) दलाकडू बचावकार्य युद्धपातळीवर (Rescue operation ) सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला पूर्व भागातील नाईकनगर परिसरात ही घटना घडली आहे. चार मजली इमारत सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक कोसळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य आणि मदतकार्य सुरु केले. 4 ते 5 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती महानगर पालिकेने दिली आहे. तर ढिगाऱ्याखाली आणखी 20-25 जण अडकल्याची भीती आहे. या सर्वांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान, एनडीआरएफचे पथक, श्वान पथक, पोलिस आणि स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

नाईकनगर परिसरात एकमेकांना खेटून चार इमारती आहेत. या इमारती धोकादायक झाल्याने चारही इमारतींना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस देण्यात आली होती. पालिकेने रहिवाशांना स्थलांतर करण्याची सूचना दिली होती. तरी सुद्धा रहिवाशांनी इमारती रिकाम्या केल्या नव्हत्या. ते त्याठिकाणीच राहत होते. त्यामधील एक इमारत अचानक कोसळली. या इमारतीमध्ये 8 ते 10 कुटुंबे राहत होती. हे सर्व भाडेकरू आहेत. इमारत कोसळल्यानंतर पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -