ताजी बातमी ऑनलाईन टीम
नागपूर : नागपुरात बुधवारी दुपारी भयानक घटना घडली. दाभा परिसरातील सेंटर पॉईंट शाळेतील ही थरारक घटना आहे. 13 वर्षाची मुलं र शाळेच् मैदानात खेळत होती. अचानक दोघांचा वाद झाला. यात एकाने स्वीस चाकू काढला. दुसऱ्यावर वार केले. यात एक विद्यार्थी जखमी झाला. जखमीच्या पालकांना सांगण्यात आलं. त्यानंतर जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याला तात्पुरते निलंबित करण्यात आल्याचं मुख्याध्यापिका परवीन कसाड यांनी सांगितलं.
नेमकं काय घडलं
बुधवारी दुपारी बारा वाजताची वेळ. मधला ब्रेक झाल्यानं विद्यार्थी मैदानावर खेळत होते. दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. किरकोळ वादातून एका विद्यार्थ्याने स्वीस चाकू काढला. दुसऱ्यावर वार केले. यात तो जखमी झाला. ही घटना दाभा येथील सेंटर पॉईंट स्कूलमध्ये घडली. गिट्टीखदान पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. पण, तक्रार करण्यात आली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. गिट्टीखदानचे पोलीस निरीक्षक बापू ढेरे म्हणाले, दोन्ही विद्यार्थी एकाच वर्गातील आहेत.
13 वर्षीय वर्गमित्रावर मैदानात चाकूने हल्ला,
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -