Wednesday, July 30, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : सख्खा भाऊ बनला वैरी! वाटणीवरून मोठ्या भावाकडून खून

कोल्हापूर : सख्खा भाऊ बनला वैरी! वाटणीवरून मोठ्या भावाकडून खून

कोल्हापूर(राधानगरी) तालुक्यातील कसबा तारळेत मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. सख्ख्या भावानेच धाकट्या भावाचा खून केल्याचे उघड घेताच पंचक्रोशीत खळबळ माजली आहे. धोंडीराम विठू पाटील (वय ४०) यांनी आपल्याच प्रकाश विठू पाटील (वय ३८) या लहान भावाचा खून केला आहे. वारंवार दारू पिऊन दंगा करणे, शेत जमिनीची वाटणी मागतो या कारणांनी लाकडी हुंडक्याने डोक्यावर व तोंडावर जबर मारहाण करून खून केला आहे.सदरची मारहाण केल्यानंतर आरोपी राहत्या घराला कुलूप लावून फरार झाला होता. चार दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, चार दिवसानंतर मयत यांचे चुलत भाऊ महादेव पाटील याने घरातून दुर्गंधी असे वाटल्याने कुलूप तोडले. घरात पाहिले असता प्रकाश पाटील यांचा खून झाल्याचे निदर्शनास आले. महादेव पाटील यांनी तातडीने राधानगरी पोलीस स्टेशन संपर्क साधून कळवले. प्रथमदर्शनी प्रकाश याचा मृत्यू दारू पिऊन झाला असेल असे वाटले. पण राधानगरी पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब कोळी व पोलीस निरीक्षक विजयसिंह घाडगे यांनी सखोल तपासणी केली असता, सदरचा मृत्यू दारू पिऊन नसून खून झाल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर तातडीने मयत प्रकाश यांचा भाऊ धोंडीराम पाटील यांना संशयित म्हणून अटक केली. त्यानंतर धोंडराम यांची कसून चौकशी केली असता त्याने आपणच भावाचा दारू पिऊन दंगा करतो व शेत जमिनीची वाटणी मागतो म्हणून खून केल्याचे कबूल केले. अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी व पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे करत आहेत. आरोपी धोंडीराम पाटील व मयत प्रकाश पाटील यांनी पंधरा वर्षांपूर्व धोंडीराम पाटील यांची पत्नी संगीता हिचा जाळून खून केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -