Friday, August 1, 2025
Homeब्रेकिंग25 वर्षे एक रुपयाही वीज बिल येणार नाही; सरकारच्या ‘या’ योजनेत व्हा...

25 वर्षे एक रुपयाही वीज बिल येणार नाही; सरकारच्या ‘या’ योजनेत व्हा सहभागी

भारत सरकार मागील काही दिवसांपासून ऊर्जेच्या पारंपरिक स्रोतांना पर्याय म्हणून इतर स्रोत बघत आहे. सरकारला पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करून आयात खर्च कमी करायचा आहे. देशाला परकीय चलनाच्या साठ्याच्या दृष्टीने याचा मोठा फायदा मिळणार आहे. पर्यावरण रक्षणाबाबतही याची मदत मिळणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून 2030 पर्यंत अपारंपरिक पद्धतीने 40 टक्के वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. सरकारनं या वर्षाच्या अखेरीस सौर उर्जेपासून 100 GW वीज निर्मिती करण्याचा निर्धार केला आहे. यापैकी 40 मेगावॅट वीज छतावर सौर पॅनेल बसवून निर्माण करण्याचं सरकारचं नियोजन आहे.

40 मेगावॅट वीज निर्मितीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार घराच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदानही देणार आहे. वीज विकून कमाई करण्याची ही योजना लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या योजनेंतर्गत सौर पॅनेल बसविण्याचा खर्च अत्यंत कमी येणार आहे. काही भाग सरकारकडून अनुदानाच्या रुपात दिला जाणार असल्याने लोकांना चांगला फायदा होणार आहे. केंद्र सरकारशिवाय अनेक राज्य सरकारेही त्यांच्या वतीनं अतिरिक्त अनुदान देणार आहेत. सोलर पॅनल आपल्या छतावर बसवल्यामुळे लोकांना वीज बिलाचा येणार त्रास कमी होणार आहे.

घरातील दैनंदिन वापरासाठी लागणारी वीज छतावरील सोलर पॅनलमधूनच तयार होणार आहे. या योजनेसाठी घराला 2-4kW चा सोलर पॅनल पुरेसा असतो. एक एसी, 2-4 पंखे, एक फ्रीज, 6-8 एलईडी लाईट, 1 पाण्याची मोटर आणि टीव्ही यांसारख्या गोष्टी आरामात वापरता येणार आहेत. समजा तुमचे छप्पर 1000 चौरस फूट असेल तर तुम्ही 500 स्क्वेअर फूट मध्ये सौर पॅनेल बसवले तर प्लांटची क्षमता 4.6kW होईल. यामध्ये एकूण 1.88 लाख रुपये खर्च येणार असून, तो अनुदानानंतर 1.26 लाख रुपयांवर येईल आणि दरमहा सुमारे 4232 रुपयांचे वीज बिल वाचवण्यात येईल. सौर रूफटॉप स्थापित करण्यासाठी, तुम्ही https://solarrooftop.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -