कोल्हापूर : शिक्षण क्षेत्रासह जिल्हयाचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था (कोजिमाशि) निवडणुकीत सत्ताधारी स्वाभिमानी सहकार आघाडीचे सर्व साधारण गटातील १६ उमेदवार ४०० ते ७०० मतांनी आघाडीवर आहेत.
‘कोजिमाशि’साठी शनिवारी चुरशीने ९५.०७ टक्के मतदान झाले. त्यामुळे निवडणुकीचा निकाल काय लागतो. याकडे शिक्षक सभासदांचे लक्ष लागून राहिले होते. रविवारी रमणमळा येथील बहुद्देशीय सभागृहात मतमोजणी सुरू झाली. सत्ताधारी आघाडीचे उमेदवार आघाडीच्या उमेदवारांची विजयाचे दिशेने वाटचाल सुरू आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, तसा सत्ताधारी गटाच्या समर्थकांनी फटक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत जल्लोष सुरू केला आहे.




