वर्धा : शनिवारी मुसळधार आलेल्या पावसामुळे नदी नाल्याना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. शहरातील नाल्याला आलेला पूर पाहण्यासाठी गेलेले दोन चिमुकले पाण्यात बुडाले आहे. ही घटना वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथे घडली. बुडालेल्या दोघांपैकी एकाच मृतदेह सापडला आहे तर दुस-याचा शोध सुरु आहे. पुलगाव (Pulgaon) येथील बरांडा परिसरातून वाहणाऱ्या नाल्याला शनिवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात पूर आला होता.
हा पूर पाहण्यासाठी येथीलच प्रणय जगताप (वय 14 वर्ष) आणि आदित्य शिंदे (वय 15 वर्ष) हे दोघेही गेले होते. दरम्यान हे दोन्ही चिमुकले पुराच्या पाण्यात सापडल्याने वाहून गेले. यापैकी प्रणय जगताप (Pranay Jagtap) या मुलाचा मृतदेह सापडला. आदित्य शिंदे (Aditya Shinde) या मुलाच्या मृतदेहाचा शोध प्रशासनाकडून घेतल्या जात आहे.