कोल्हापूर : (Shivsena) शिवसेनेतून बंडखोरी वाढत असताना आता पक्षाच्यावतीनेही कारवाईला सुरवात झाली आहे. (Kolhapur) कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शिवसेना कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. येथील विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला असून खासदार संजय मंडलिक यांनी केली घोषणा केली. यामध्ये सर्वच कार्यकरणी ही बरखास्त करण्यात आली आहे.
तर 31 ऑगस्ट पर्यंत पक्षाची पुनर्बाधणी केली जाणार आहे. गुरुवारी त्या अनुशंगाने कोल्हापुरात शिवसेनेचा मेळावा होणार आहे.