गुगल जगामध्ये सध्याच्या काळात सर्वात मोठं सर्च इंजिन आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीनुसार वारंवार गुगल सर्च इंजिन आणि त्याच्या फीचर्समध्ये बदल होताना दिसत आहे. गुगलमॅपमुळे अनेक गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. गुगल मॅपच्या माध्यमातून आता फक्त एखाद लोकेशनचं पाहणं शक्य आहे असं नाही तर तर याबरोबरच अनेक फीचर्स आहेत ज्याचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी साध्य करू शकता. गुगल नेहमीच आपल्या वापरकर्त्यांना नवनवीन फीचर्स भेट देत असते. Google ने त्यांच्या Maps सेवेमध्ये स्टॉपपेज जाहिरात वैशिष्ट्ये दिली आहेत,ज्याद्वारे तुम्ही एकाच वेळी अनेक ठिकाणे जोडू शकता.
Google Maps वर एकाच वेळी जास्तीत जास्त नऊ स्टॉप जोडले जाऊ शकतात. कंपनीने नुकतेच गुगल मॅपमध्ये एक नवीन फीचर लाँच केले आहे. हे नवीन फीचर टोल टॅक्सच्या संदर्भात माहिती देण्याचे काम करते. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही निवडलेल्या मार्गावर तुम्हाला किती टोल टॅक्स भरायचा याबद्दल माहिती मिळते. गुगल मॅपचे हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. लांबचा प्रवास करण्यासाठी जास्त पेट्रोल आणि इंधनाची गरज असते.
अशा वेळी गुगल मॅप यूजर्सना या अँप्सच्या माध्यमातून पेट्रोल पंप रेस्टॉरंट्स, कॅफे, फास्ट फूड कॉर्नर आणि एटीएमची माहिती देते. प्रवास म्हटला की वाहतुकीचा, ट्रॅफिक जॅमचा अनुभव येणे साहजिकच आहे. ट्रॅफिक जॅम असल्यावर बराच वेळ जातो.
ही सुविधा गुगल मॅप्समध्ये देण्यात आलेली आहे. या सुविधेचा वापर करून यूजर्सना मार्गात कोणत्या प्रकारची ट्रॅफिक जाम आहे हे कळेल. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही ट्रॅफिकचा अंदाज घेऊन तुमचा मार्ग बदलू देखील शकता.