राज्यात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy rains) सुरु आहे. मुंबई, कोंकण, मराठवाडा आणि विदर्भा पावसाने (Torrential Rains) हाहाकार माजवला आहे. काही ठिकाणी उपेक्षित पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. मात्र राज्यात सुरु असलेल्या या पावसात आत्तापर्यंत वेगवेगळ्या घटनात 70 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भात अतिवृष्टी झाली (Rains in Vidarbha And Central Maharashtra), तर मराठवाड्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Rains in Marathwada) झाला. हवामान खात्यानं आजही पावसाचा इशारा (Meteorological Department Warned) दिला आहे. प्रशासनाकडून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
आज देखील हवामान खात्याने काही भागांमध्ये रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. आयएमडीने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि नाशिकमध्ये देखील अतिवृष्टाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात आतापर्यंत 70 हून अधिक बळी
मिळालेल्या माहितीनुसार राज्यात गेल्या 24 तासांत पावसामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत 70 हून अधिक लोकांचे बळी गेले आहेत.पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. अंबा, सावित्री, पाताळगंगा, गढी आणि उल्हाससह अनेक नद्यांमधील पाणी धोक्याच्या पातळीच्या जवळ आहे. पावसामुळे बाधित झालेल्या सुमारे 5 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आजही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अकोला, नागपूर, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.