Friday, August 1, 2025
Homeब्रेकिंगAImatti : अलमट्टीतून १ लाख क्युसेक विसर्ग सुरु; धरण ७१ टक्के...

AImatti : अलमट्टीतून १ लाख क्युसेक विसर्ग सुरु; धरण ७१ टक्के भरले

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अलमट्टी धरणातून (Almatti Dam) आज (दि.१२) सकाळी १० वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग ७५ हजारावरुन १ लाख क्युसेक करण्यात आला आहे. गेली दोन दिवस या धरणातून पाण्याचा विसर्ग ७५ हजार क्युसेक करण्यात येत होता. या धरणाची क्षमता १२३ टीएमसी असून सध्या या धरणात पाणीसाठा ८७.९९ टीएमसी आहे. हे धरण सध्या ७१.५३ टक्के भरले आहे. या धरणामध्ये आता १ लाख ४ हजार ८५२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

आज कृष्णा नदीची पाणी पातळी जवळपास तीन फुटांनी वाढली आहे. कृष्णा खोऱ्याच्या पूर्व पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे पातळीत वाढ होत आहे. कोयना धरणातून शून्य, वारणा धरणातून ८८५ क्युसेक, दूधगंगा धरणातून ९०० क्युसेक, पंचगंगा नदी, कुंभी धरणातून ५५० क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातील कृष्णा खोऱ्यातील धरणांमधून एकूण विसर्ग २ हजार ३३५ क्युसेक आहे. कोयना धरणातून ७५ टीएमसी पाणीसाठा झाल्यानंतरच विसर्ग सोडण्यात येईल, अशी माहिती कोयना धरणाच्या अधिकाऱ्यानी दिली असल्याची माहिती बेळगावच्या पाटबंधारे अधिकाऱ्याकडून देण्यात आली. सध्या कोयना धरणात ३५ टीएमसी पाणीसाठा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -