Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरKOLHAPUR; प्राध्यापकाचा बंद बंगला फोडला, नवीन वाशी नाका परिसरातील घटना

KOLHAPUR; प्राध्यापकाचा बंद बंगला फोडला, नवीन वाशी नाका परिसरातील घटना

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर-नविन वाशी नाका परिसरातील प्राध्यापकांचा बंद बंगला अज्ञात चोरटय़ांनी फोडून ११ तोळे दागिन्यांसह रोख ७० हजार रुपये असा साडे सहा लाख रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद आनंदा मशाप्पा कांबळे (वय ५५ रा. एवन कॉलनी, नविन वाशी नाका, अमर विकास सोसायटी) यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली.


याबाबत अधिक माहिती अशी की, आनंदा कांबळे हे राधानगरी येथील एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीस आहेत. नविन वाशीनाका येथील एवन कॉलनीमध्ये त्यांचा बंगला आहे. याठिकाणी पत्नी व मुलासोबत ते राहतात. रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घरगुती कामानिमीत्त ते कुटूंबासह बत्तीस शिराळा (जि. सांगली) येथे नातेवाईकांकडे गेले होते. सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घटना घडल्याचा अंदाज व्यक केला आहे. २५ ग्रॅम सोन्याचा लक्ष्मी हार, ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे घंटन, १५ ग्रॅम सोन्याचा नेकलेस, १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र, २५ ग्रॅम वजनाचे सोन्याची चेन, १० ग्रॅम वजनाचे सोन्याच्या अंगठय़ा, २ ग्रॅम सोन्याचे मनी.रोख ७० हजार रुपये चोरी झाल्याचे समोर आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -