Friday, November 22, 2024
Homeबिजनेससोने-चांदी खरेदीची संधी, एक ग्रॅम चांदी फक्त 55 रुपयांना..?

सोने-चांदी खरेदीची संधी, एक ग्रॅम चांदी फक्त 55 रुपयांना..?


जगभरातील व्याजदरात सातत्याने होणारी वाढ आणि डॉलर मजबूत झाल्याचा थेट परिणाम सोन्यावर झाला आहे. सोन्याचे दर तात्पुरते जरी काहीसे वाढत असले तरी अस्थिर असणाऱ्या बाजारामुळे विश्लेषकांच्या मते, हा दर आणखी खाली घसरून पुढील 3 ते 6 महिन्यांचा अंदाज बांधला तर सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 48 हजार रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो.


गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर:
पूणे – 50,640 रुपये
मुंबई – 50,620 रुपये
नागपूर – 50,220 रुपये
चेन्नई – 50,900 रुपये
दिल्ली – 50,620 रुपये
हैदराबाद – 50,620 रुपये
कोलकत्ता – 50,620 रुपये
लखनऊ – 50,780 रुपये

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर:
पूणे – 46,420 रुपये
मुंबई – 46,400 रुपये
नागपूर – 46,620 रुपये
चेन्नई – 46,660 रुपये
दिल्ली – 46,400 रुपये
हैदराबाद – 46,400 रुपये
कोलकत्ता – 46,400 रुपये
लखनऊ – 46,550 रुपये


देशातील 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर जवजवळ 400 रुपये तर 24 कॅरेट सोने हे 440 रुपयांनी वाढल्याची माहीती आहे. तर देशात 1 ग्रॅम चांदीचा भाव 55.40 रुपये असा आहे तर 1 किलो चांदी 55,400 रुपयांना येत आहे. आज सोने महाग तर चांदी स्वस्त (Gold silver Price Today) झाली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत सोन्याचा भाव आणखी वाढला तर तुमची खरेदी करणे महागात पडण्यापेक्षा लवकरात लवकर खरेदी करून घ्या.
(वरील दर आणि आपल्या शहरांतील दरांमध्ये किंचित फरक असेल. आपण स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधून अचूक दर जाणून घेऊ शकता.)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -