ताजी बातमी ऑनलाईन टीम
येथील शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांचे पती शिवकुमार शिंदे यांना आज सोमवारी सकाळी अज्ञात पाच ते सहा जणांनी काठ्या व लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजकीय वादातून ही मारहाण झाल्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी (दि.२५) रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास येथील हनुमान नगरमध्ये शिंदे यांच्या घरासमोरच मारहाणीची ही घटना घडली आहे. मोटार सायकलवरुन आलेल्या पाच ते सहा जणांनी शिवकुमार शिंदे यांना मारहाण केली. या सर्वांनी तोंड बांधलेले होते. या घटनेनंतर परिसरातील लोकांनी जखमी शिंदे यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सांगली येथे नेण्यात आले.
सांगली : शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला, गंभीर जखमी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -