Tuesday, July 29, 2025
Homeक्रीडाभारताने मोडला पाकचा विश्वविक्रम! विंडीजविरुद्ध सलग 12वी मालिका जिंकून रचला इतिहास

भारताने मोडला पाकचा विश्वविक्रम! विंडीजविरुद्ध सलग 12वी मालिका जिंकून रचला इतिहास


त्रिनिदाद येथे खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा 119 धावांनी दारुण पराभव केला. भारताने 39 वर्षांनंतर पहिल्यांदाच विंडीजला वनडे मालिकेत त्यांच्याच घरच्या मैदानावर क्लिन स्विप दिला. पावसाने व्यत्यय आणलेला शेवटचा सामना जिंकून भारताने पाकिस्तानचा मोठा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. टीम इंडियाने एका देशाविरुद्ध सलग सर्वाधिक एकदिवसीय मालिका जिंकण्याच्या नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विंडीजविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना 119 धावांनी जिंकून इतिहास रचला. 1983 पासून, भारताने कॅरेबियन भूमीवर द्विपक्षीय वनडे मालिका खेळण्यास सुरुवात केली. तेव्हापासून ते कालची मालिका पार पडेपर्यंत भारतीय संघाला विंडीजला त्यांच्याच मैदानावर वनडे मालिकेत क्लीन स्वीप देता आला नव्हता. पण शिखर धवनच्या नेतृत्वाखालील खेळणा-या भारतीय संघाने 39 वर्षांनंतर वनडे मालिकेत विंडीजचा 3-0 असा धुव्वा उडवला आहे.


RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -