ताजी बातमी ऑनलाईन टीम
नवी दिल्ली : आधी आमदार फुटले आणि सरकार पडलं. राज्यात नवं सरकार आलं. त्यानंतर ठाकरेंकडील एकापाठोपाठ एक खासदारही फुटू लागले आणि तब्बल बारा खासदार हे शिंदे गटात सामील झाले. आधीच आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ठ असताना, आता उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना र घेरण्याचा आणखी एक प्रयत्न केला आहे.
शिंदेंसोबत गेलेल्या बारा खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे दाखल केलेली आहे. त्यामुळे आता हेही प्रकरण कोर्टात जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच लोकसभा अध्यक्ष या प्रकरणावर काय निर्णय घेतात? याकडेही संपूर्ण देशाचे डोळे लागलेले आहेत. मात्र सध्या याचिकांची लढाई राज्यातलं राजकारण चांगलेच अनुभवत आहे.