Saturday, July 5, 2025
Homeब्रेकिंगमोठी बातमी : अखेर ९ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत 'ईडी'च्या ताब्यात

मोठी बातमी : अखेर ९ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ‘ईडी’च्या ताब्यात


गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले. या प्रकरणी वारंवार समन्स बजावून चौकशीला हजर न राहून सहकार्य न केल्याची नोंद करत ‘ईडी’ने संजय राऊत यांच्या मुंबईतील भांडुप येथील घरावर छापेमारी करत आज सकाळी त्यांची चौकशी सुरु होती .



ईडीच्या १० अधिकाऱ्यांच्या पथकाने रविवारी सकाळी सात वाजता राऊत यांच्या मुंबईतील भांडुप येथील घरावर छापेमारी केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या घरी शोधमोहीम राबवत राऊत यांच्यासह त्यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि बंधू आमदार सुनील राऊत यांची चौकशी केली. तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -