देशात मंकीपॉक्स व्हायरसची (Monkeypox virus) प्रकरणे सापडल्यानंतर आता राज्यातही अशीच लक्षणे असणारी प्रकरणे समोर येत आहेत. बालकांच्या हात, पाय आणि चेहऱ्यावर असेच संक्रमण होत असल्याचे आढळले आहे. मुलांमध्ये मंकीपॉक्ससारखी (Monkeypox) लक्षणे आढळल्याने आई-वडिलांची चिंता वाढली आहे.
मुंबई (Mumbai) आणि ठाणे (Thane) शहरामध्ये बालकांमध्ये मंकीपॉक्ससारखी लक्षणे दिसण्याचे प्रमाण मोठे आहे. यामध्ये हात, पाय आणि तोंडाला विषाणूजन्य संसर्ग होत आहे. तसेच हात, पाय आणि तोंडाजवळ बारीक पुरळ येत आहेत. यासोबतच ताप (fever) देखील येत आहे. काहींना तोंडात अल्सर (mouth ulcer) होत असल्याचे देखील समोर येत आहे. गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये अशा प्रकारचा संसर्ग मुलांमध्ये होत असल्याचे आढळले आहे. व्हायरल संक्रमण हे पावसाळ्यात जास्त आढळतात, ज्या प्रमाणे सर्दी, खोकला असतो. त्याच प्रमाणे हे देखील संक्रमण पावसाळ्यातच आढळते.
मंकीपॉक्ससाठी टास्क फोर्सची स्थापना
देशात मंकीपॉक्स व्हायरसच्या रुग्णांवर विशेष नजर ठेवण्याचे आणि आजार पसरण्यापासून रोखण्यासाठी टास्ट फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. अधिकृत सूत्रांनी याविषयी माहिती दिली आहे. भारतामध्ये मंकीपॉक्सचे आतापर्यंत 5 रुग्ण आढळलेले आहेत. तसेच मंकीपॉक्स ही जागतिक सार्वजनिक आणीबाणी असल्याचे WHO ने घोषित केले आहे.
मंकीपॉक्सविषयी महत्त्वाचे
मंकीपॉक्स एक व्हायरल आजार आहे आणि या आजाराचे मुख्य लक्षणं ताप, शरीरावर पुरळ येणे, खोकला आणि लिम्फ नोड्सवर सूज येणे हे आहे.
याचा मृत्यूदर 1 ते 10 टक्के आहे.
या रोगाची व्यापकता 7 ते 14 दिवसांची असते.
हा आजार प्राण्यांमधून मानवात आणि मानवातून मानवात पसरतो.
हा व्हायरस संक्रमित त्वचा किंवा श्वसन पथाला संक्रमित करतो.
हा आजार संक्रामक आहे आणि हा आजार 1 ते 2 दिवसांमध्ये एका रोग्यामधून दुसऱ्या रोगीमध्ये पसरतो.
संसर्गापासून वाचण्यासाठी काय करावे?
हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
आजारी रुग्णांचे टॉवेल, चादर, भांडे आणि कपडे वापरु नयेत.
रुग्णांची काळजी घेताना, मास्क, हातमोजे इत्यादींचा वापर करावा.
आजारी व्यक्तीने वन्य प्राण्यांच्या संपर्कात येऊ नये.