घरात झोपलेल्या (sleeping) आपल्या मुलाला उठवण्याचा प्रयत्न केला असता तो न उठल्याने आलेल्या रागातून सारिका संपत यादव (वय 35, रा. बिरदेवनगर पारगाव, ता. हातकणंगले) या महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
सारिका यादव यांचा मुलगा आर्यन (12) सकाळी नऊ वाजले तरी उठला (sleeping) नाही. त्याला उठविण्याचा प्रयत्न केला तरी तो न उठल्याने तुला आता मी परत तोंड दाखवणार नाही, असे म्हणून सारिका रविवारी सकाळी घरातून रागाने निघून गेली.
पारगाव पाणंदशेजारच्या जाधव मळ्यातील विहिरीमध्ये उडी टाकून सारिकाने आत्महत्या केली. मंगळवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान विहिरीत सारिकाचा मृतदेह तरंगताना आढळला. सारिका यांच्या मागे पती व एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली आहे.