Saturday, July 5, 2025
Homeसांगलीसांगली : या हद्दीत तरुणाचा खून, संशयित ताब्यात

सांगली : या हद्दीत तरुणाचा खून, संशयित ताब्यात

महाराष्ट्र-कर्नाटक हद्दीवर चाबुकस्वारवाडी (ता. मिरज) गावच्या हद्दीतील रस्त्यावर तरुणाचा खून झाला. संदीप आवळेकर (वय ३०, रा. अरळहट्टी) असे तरुणाचे नाव आहे. सलगरे-अरळहट्टी रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. कोयत्यासारख्या धारदार हत्याराने वार करुन बुधवारी रात्री उशीरा खून करण्यात आल्याची माहिती आहे.

खुनाची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पहाटे तीन वाजेपर्यंत एका संशयित व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
खून झालेल्या झालेल्या संदीप आवळेकर यांचा कुपवाड येथील भाऊ आल्यानंतर पहाटे चार वाजता मृतदेह शव विच्छेदनसाठी नेण्यात आला असल्याची माहिती पोलीस पाटील उद्धव खोत यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -