Sunday, July 6, 2025
Homeराजकीय घडामोडीपक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको ; सुप्रीम कोर्टाच्या निवडणूक आयोगाला सूचना

पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको ; सुप्रीम कोर्टाच्या निवडणूक आयोगाला सूचना



महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सोमवारी सुनावणी होणार असा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने दिला. पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको असे निवडणूक आयोगाला आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोग सुनावणी घेऊ शकतो. मात्र, निर्णय घेऊ शकत नाही असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले. याचिका मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्याबाबात सोमवारपर्यंत निर्णय घेण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. तसेच सर्वांचे लिखित युक्तीवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ असेही कोर्टाने सांगितले. दोन्ही गटाला संतुलित करण्याचा प्रयत्न यावेळी कोर्टाने केला आहे. निवडणूक आयोगानं नोटीशीबाबत वेळ वाढवून द्यावा असेही सांगितले.
सुप्रीम कोर्टात काय घडलं?

सिब्बल आणि सिंघवी यांचा युक्तीवाद मूळ पक्ष असल्यास दावा करणारे ४० आमदार अपात्र ठरल्यास पुढचं काय? बंडखोरांकडून राजकीय पक्ष, विधिमंडळ पक्ष यात गल्लत होत आहे असा युक्तीवाद सिब्बल यांनी केला. तर सरन्यायाधीशांनी सिब्बल यांना विचारले की, हा मुद्दा राजकीय पक्षाशी संबंधित आहे. आपण निवडणूक आयोगाला त्यांच्यासमोर आलेल्या प्रकरणांवर सुनावणी घेण्यापासून रोखू शकतो का, असा सवाल केला. यावर सिब्बल म्हणाले, सगळे आमदार अपात्र ठरले तर निवडणूक आयोगासमोर कोणता दावा करणार?

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -