Friday, December 19, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : पंचगंगेने गाठली इशारा पातळी

कोल्हापूर : पंचगंगेने गाठली इशारा पातळी


जिल्ह्यात मंगळवारी पावसाने उसंत घेतली. तरीही पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरूच असून पंचगंगेने रात्री 10 वाजता इशारा पातळी गाठली. पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणांच्या पाणी पातळीतही वाढ सुरूच आहे. राधानगरी धरण काठोकाठ भरले असून कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. चित्री आणि कडवी ही आणखी दोन धरणे मंगळवारी भरली. पंचगंगा यावर्षी प्रथमच इशारा पातळीवर गेली. यामुळे जिल्ह्याला महापुराचा धोका कायम आहे.



पावसाने उघडीप दिली असली तरी कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर मांडुकलीसह तीन ठिकाणी आलेले पाणी पूर्ण ओसरलेले नाही. यामुळे आजही हा मार्ग वाहतुकीसाठी बंदच होता. कोल्हापूर-राजापूर मार्गावर करंजफेणजवळ आलेले पाणीही ओसरल्याने अणुस्कुरा घाटातून होणारी वाहतूक पूर्ववत सुरू झाली. दरम्यान, मंगळवारी सकाळपासूनच पावसाने उसंत घेतली. सकाळी काही काळ सूर्यदर्शनही झाले. अधूनमधून कोसळणारी सर वगळता पावसाची संततधार नव्हती. यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली. पावसाचा जोर कमी झाला असला तरी पंचगंगेच्या पातळीत संथ वाढ सुरूच आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -