Sunday, July 6, 2025
Homeतंत्रज्ञान16 ऑगस्टपासून Samsung Galaxy Z Fold 4 चे प्री-बुकिंग सुरु, जाणून घ्या...

16 ऑगस्टपासून Samsung Galaxy Z Fold 4 चे प्री-बुकिंग सुरु, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सॅमसंग कंपनीने नुकताच भारतामध्ये आपले फ्लॅगशिप असलेले दोन फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. सॅमसंग कंपनीने Samsung Galaxy Z Fold 4, Samsung Galaxy Z Filp 4 यासोबतच Galaxy Buds 2 Pro हे लॉन्च केले. दोन्ही स्मार्टफोन प्रीमियम फीचर्स आणि प्रायसिंगवर येतो. Samsung Galaxy Z Fold 4 मध्ये तम्हाला पहिल्यांदाच अंडर डिस्प्ले कॅमेरा पाहायला मिळणार आहे. कंपनीने या दोन्ही स्मार्टफोनचे प्री-बुकिंग जाहीर केले आहे. हे प्री-बुकिंग 16 ऑगस्टपासून दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणआर आहे. सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवर दोन्ही स्मार्टफोन प्री-बुकिंगसाठी उपलब्ध केले जातील.



Samsung Galaxy Z Fold 4 डिझाइन –
Samsung Galaxy Z Fold 4 चे डिझाइन पहिल्यासारखीच आहे पण फोन हलका करण्यात आला आहे. Samsung Galaxy Z Fold 3 चे एकूण वजन 271 ग्रॅम होते. परंतु Samsung Galaxy Z Fold 4 चे एकूण वजन 263 ग्रॅम आहे. Samsung Galaxy Z Fold 4 मध्ये फोल्ड पॅनलवर लोगो देखील आहे. स्मार्टफोनच्या खाली स्पीकर आणि टाइप-सी पोर्ट आहे. उजवीकडे पॉवर बटण आणि व्हॉल्यूम बटणं आहेत. तर डाव्या बाजूला सिम कार्ड ट्रे आहे.

Samsung Galaxy Z Fold 4 मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 7.6-इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X Infinity Flex प्रायमरी डिस्प्ले आहे. दुसरा डिस्प्ले 6.2-इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X इन्फिनिटी ओ कव्हर डिस्प्ले आहे. डिस्प्लेची ब्राइटनेस 1300 nits आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्लस सपोर्ट आहे. या सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आहे. यात 4400mAh बॅटरी असून 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट आहे. सोबत वायरलेस चार्जिंग देखील आहे. Android 12 फोनसोबत उपलब्ध असेल. फोनमध्ये 512 GB पर्यंत स्टोरेज मिळेल.

Samsung Galaxy Z Flip 4 या स्मार्टफोनची किंमत $999 म्हणजे सुमारे 79,000 रुपयांपासून सुरु होत आहे. हा स्मार्टफोन ब्लू, बोरा पर्पल, ग्रेफाइट आणि पिंक गोल्ड कलरमध्ये उपलब्ध असेल. तर, Samsung Galaxy Z Fold 4 या स्मार्टफोनची किमंत $1,799.99 म्हणजेच सुमारे 1,42,7000 रुपयांमध्ये मिळेल. हा स्मार्टफोन बेज, ग्रे-ग्रीन आणि फँटम ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -