Monday, November 24, 2025
Homeमनोरंजनमनोरंजन : करण जोहरने घेतला मोठा निर्णय, करणार लग्न!

मनोरंजन : करण जोहरने घेतला मोठा निर्णय, करणार लग्न!

‘कॉफी विथ करण’ हा शो नेहमीच चर्चेत असतो. या शोचा 7 वा सीझन सोशल मीडियावर चांगलाच (koffee with karan kangana) धुमाकूळ घालत आहे. अलीकडेच त्याचा नवा एपिसोड रिलिज झाला आहे. या एपिसोडमध्ये सोनम कपूर आणि अर्जुन कपूर सहभागी झाले होते. होस्ट करण जोहरने या एपिसोडमध्ये दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफवर आपण नाराज असल्याचे सांगितले आहे. करणने केलेल्या या गौप्यस्फोटानंतर त्याने त्या दोघींवरील रागाचे कारणही जाहीर केले आहे. त्यात तो म्हणाला की तो आता दीपिका आणि कतरिनाचा बदला घेणार आहे.

करण जोहर ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय शोचा 7 वा सीझन (koffee with karan kangana) होस्ट करत आहे. या शोमध्ये करण आपल्या सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबत अनेक खुलासे करतो. त्यातून आता या शोमध्ये करण जोहरने आपण लग्न करण्याचा विचार करत असल्याचा खुलासाही केला आहे. बदला घेण्यासाठी त्याला लग्न करायचे आहे, असेही त्याने सांगितले.

दीपिका आणि कतरिनाने त्यांच्या लग्नाचे आमंत्रण दिले नाही त्यामुळे करण जोहर नाराज आहे. तेव्हा आता त्याचा बदला घेण्यासाठी तो त्या दोघांनाही त्याच्या लग्नात बोलवणार नसल्याचे त्याने सांगितले आहे. वास्तविक त्याने कुणाचेही नाव घेतले नसले तरी त्याच्या या नाराजीवरून त्याने दीपिका आणि कतरिनाला लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. दीपिका पदुकोणने 2018 मध्ये इटलीमध्ये तर कतरिना कैफने 2021 मध्ये राजस्थानमध्ये लग्न केले. या दोन्ही लग्नात करण जोहरला आमंत्रित करण्यात आले नव्हते. लग्नाला फक्त जवळचे लोक आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -