Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखा

कोल्हापूर : गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखा


ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर ; गणेशोत्सव जोशात आणि मोठ्या उत्साहात साजरा करा पण कायदा आणि सुव्यवस्था कायम राहील याचीही खबरदारी घ्या, असे आवाहन शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी केले. सार्वजनिक गणेशोत्सव २०२२ च्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीतील कसबा बावडा व लाईन बाजार मधील मंडळाच्या कार्यकर्त्यांची तसेच पदाधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते.


यावेळी बोलताना राजेश गवळी म्हणाले की, राज्यात कसबा बावडा हे एकमेव असे ठिकाण आहे की, सजीव देखावे सादर केले जातात. प्रेरणादायी देखाव्यांना वेळेच्या बंधनाबाबत पोलीस प्रशासन सकारात्मक आहे. शक्य असेल तर मंडळांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवण्याची व्यवस्था करावी.

बैठकीत कोल्हापूर महानगरपालिका उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, महावितरणचे अभियंता सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. उदय गायकवाड यांनी पर्यावरण पूरक गणेश उत्सवाबाबत मार्गदर्शन केले. सुनील जवाहीरे यांनी गणेशोत्सव साजरा करताना घ्यावयाची काळजी आणि नियमांचे वाचन केले. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते तानाजी चव्हाण, आनंदा करपे, निरंजन पाटील, चेतन बिरंजे आदींनी मंडळाच्या वतीने गणेशोत्सव साजरा करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -