Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : लक्ष्मी मंदिरातील पावणेसहा लाखांचे दागिने लंपास

कोल्हापूर : लक्ष्मी मंदिरातील पावणेसहा लाखांचे दागिने लंपास

ताजी बातमी ऑनलाईन टीम

हालेवाडी : येथे वस्तीत असणाऱ्या लक्ष्मी मंदिराचे दरवाजाचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्यांनी मूर्तीवरील पाच लाख 72 हजार रुपयाचे सुमारे १४ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या घटनेमूळे उत्तूर पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शुक्रवार दिनांक १९ रोजी रात्री ते शनिवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी भरवस्तीत असणाऱ्या लक्ष्मी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.


मूर्तीवरील सुमारे १४ तोळे सोन्याचे दागिन्यांची चोरी केली. शनिवारी सकाळी सुनील शिवाजी पाटील (रा.हालेवाडी) हे मंदिराची स्वच्छता व मूर्तीची पूजा करण्यासाठी आले. तेव्हा चोरीचा प्रकार उघड झाला. घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी मंदिराच्या आवारात मोठी गर्दी केली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील हारगुडे व इतर पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले पथक अर्दाळच्या दिशेने मार्गस्थ झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -