मिरज तालुक्यातील टाकळी हद्दीतील सुभाष नगर येथे सुभाष नगर म्हैशाळ रोडवरील विजय देवाप्पा जत्ते यांच्या अठरा फूट खोल असलेल्या शेततळ्यात अनोळखी मृतदेह आढळून आला आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सदरच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर टाकळीचे पोलीस पाटील संजय माने यांनी मिरज ग्रामीण पोलीसात वर्दी दिली, पोलीस कर्मचारी संजीव जाधव व उदय लवटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.