Saturday, August 2, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : सातवेत एसटी चालकाच्या प्रसंगावधानाने परिचारिकेचे प्राण वाचले

कोल्हापूर : सातवेत एसटी चालकाच्या प्रसंगावधानाने परिचारिकेचे प्राण वाचले

रस्त्यावरचा खड्डा चुकवत वळणावर अचानकपणे एसटी बसच्या आडव्या आलेल्या दुचाकी स्कुटीवर असणाऱ्या परिचारीकेला वाचवण्यासाठी एसटी बाजूच्या शेतात घालून दुर्घटना टाळत परिचारीका महिलेचे प्राण वाचवल्या बद्दल चालक भारत जाधच यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सातवे ता. पन्हाळा सातवे-कोडोली मार्गावर सातवे येथे गावाबाहेरील पाटील मळ्यानजीक वळणावर स्कुटीवरून जाणाऱ्या परिचारिकेला बसणारी धडक वाचवून प्राण वाचवले. चालक भारत जाधव यांनी प्रसंगावधान राखत दुर्घटना टाळली. जाधव हे इचलकरंजी डेपोतील एसटी चालक आहेत.

बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सातवेकडे येणाऱ्या इचलकरंजी डेपोची एसटी बस MH09 5057 पाटील मळ्याच्या वळणावर येत असता स्कुटी गाडीवरून समोरुन येणाऱ्या आरळे उपकेंद्रच्या परिचारिका अदिती देसाई (वय २५) या रस्त्यातील खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करत असताना अचानक एसटी बस समोरून आली. पण प्रसगवधान राखून एस.टी चालक भरत जाधव यांनी बाजूच्या शेतवडीत गाडी वळवून त्यांचे प्राण वाचवले. तर यावेळी तोल जावून परिचारिका पडल्या. त्यामध्ये त्या किरकोळ जखमी झाल्या. त्यानंतर एसटी जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्य आली. परंतु एका महिलेचे प्राण वाचवल्याबद्दल चालकांचे र.. कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -