राज्यात सुमारे 15 हजार शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. मात्र, त्यानंतरही शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहणार आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी नोव्हेंबर महिन्यात पुन्हा ‘टीईटी’ घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले..
राज्यात शिक्षक भरतीसाठी 2014 पासून शिक्षण खात्याकडून शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) घेतली जाते. मात्र, ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे शिक्षक भरतीत अडचणी येत आहेत. शिवाय, ‘टीईटी’ पास झाल्यानंतर ‘सीईटी’ होते. ‘सीईटी’ परीक्षेतील गुणवत्तेनुसार शिक्षक भरतीसाठी (Teacher recruitment) प्राधान्य दिले जाते.
नोव्हेंबरमध्ये ‘टीईटी’
राज्य सरकारने मे महिन्यात शिक्षक भरतीसाठी ‘सीईटी’ (CET) परीक्षा घेतली होती. मात्र, या परीक्षेत विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळाल्याने अधिक प्रमाणात जागा असतानाही शिक्षकांच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने नोव्हेंबरमध्ये पुन्हा ‘टीईटी’ (TET) घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. शिवाय, दरवर्षी निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे राज्यात 15 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे.. त्यापैकी 5 हजार जागा कल्याण, कर्नाटकामध्ये भरल्या जाणार आहेत..
राज्यात शिक्षक भरती करण्यासाठी शिक्षण विभागाने नोव्हेंबरमध्ये पुन्हा ‘टीईटी’ घेण्याचा निर्णय घेतला आहे.. त्यानंतर लगेच ‘सीईटी’ घेतली जाणार आहे.. या परीक्षेतून उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
दरम्यान, कोरोनामुळे सरकारी तिजोरीवर मोठा भार पडला. त्यामुळे राज्य सरकारने मार्च-2020 पासून शिक्षक भरतीसह सगळ्याच सरकारी नोकर भरतीला स्थगिती दिली होती. मात्र, आता सारं काही पूर्ववत झाले असून, नोकर भरतीवरील निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीसह विविध खात्यांमध्ये पदभरती सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.