ताजी बातमी ऑनलाईन टीम
संभाषणासाठी व्हॉट्सअॅप हे कॉलिंग इतकेच महत्त्वाचे फिचर झालेले आहे. अनेकदा कॉलिंगपेक्षा जास्त वापर हा व्हॉट्सअॅपचा होतो. अनेक वेळा व्हॉट्सअॅपमध्ये आपण थेट कॅमेऱ्यातूनही सेल्फी फोटो किंवा व्हिडिओ एखाद्यासोबत शेअर करतो. साधारणपणे कॅमेराचा शॉर्टकट बार आपल्याला खालच्या बाजूला मिळतो. आता कंपनी त्यात मोठा बदल करण्याची तयारी करत आहे.
WhatsApp लवकरच मुख्य अॅपच्या इंटरफेसमध्ये कॅमेरा शॉर्टकट सादर करण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन अपडेटनंतर अँड्रॉईड फोनमधील कॅमेऱ्याचा शॉर्टकट सर्वात वरच्या सर्च बारवर मिळेल. सध्या कंपनी याचे ट्रायल घेत आहे. याशिवाय व्हॉट्सअॅप एका कम्युनिटी फीचरवरही काम करत आहे. याशिवाय, व्हॉट्सअॅप आणखी एका नवीन फीचरवर काम करत आहे, जे आल्यानंतर चॅट लिस्टमधूनच एखाद्याचे स्टेटस पाहता येईल.