शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर शहरातील दुचाकी (bike)चोरीच्या घटना मोठ्या संख्येने घडत आहेत. मात्र शहरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याने पुरता बोजवारा उडाला असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरीकांच्यातून उमटतं आहेत. (स्टॉर्म सॉफ्टस)त्यातच दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री मलकापूर शहरातील पोलीस चौकीच्या शेजारील मुख्य रस्त्यावरील दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.
मलकापूर शहर हे सतत गर्दी त्याचबरोबर वाहनांची (bike)वर्दळ यामुळे चर्चेत आले आहे गेले काही दिवस दुचाकी चोरीच्या घटनाही वारंवार घडत आहेत. मात्र शहरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा बहुतांश वेळा उपयोग होत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांच्यातून येत असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा नेमका वापर काय असा प्रश्नही या निमित्ताने पुढे येत आहे.
रविवारी मध्यरात्री मलकापूर शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पोलीस चौकी नजीकच लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली.(स्टॉर्म सॉफ्टस) भर रस्त्यावर पोलीस चौकी नजीकच चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे त्याचबरोबर या परिसरात अनेक व्यावसायिक दुकान असून देखील मुख्य चौकातील सीसीटीव्ही त्याचबरोबर या ठिकाणचे सुरक्षितता ही धोक्यात आली काय अशी चर्चा आता नागरिकांच्यात येऊ लागली आहे. पालिका प्रशासनाने बंद असलेले त्याचबरोबर अशी घटना घडल्यावर तात्काळ चौकशीसाठी उपयोगी पडतील असे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याची मागणी आता नागरिकांच्या होऊ लागले आहे.
एका सीसीटीव्ही कॅमेरात हालचाली कैद ज्या ठिकाणाहून दुचाकी चोरीस गेली आहे त्यापासून काही अंतरावर असलेल्या एका संस्थेचा सीसीटीव्ही कॅमेरा तपासला असता यात चार चाकीतून अज्ञाताने येऊन दुचाकी घेऊन जात असल्याचे दिसत असल्याचेही चोरी गेलेल्या गाडी मालकांनी यावेळी बोलताना सांगितले आहे. यामुळे या चोरीचा छडा लवकर लागणार का असाही आता आशावाद व्यक्त केला जात आहे.