ताजी बातमी ऑनलाईन टीम
आशिया चषक 2022 मधील दोन प्रमुख लढतीत शानदार कामगिरी करणारा टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या गुढघ्यावर सर्जरी होणार आहे. रवींद्र जडेजाला हाँगकाँगविरुद्धच्या लढतीदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला आशिया चषकातून विश्रांती देण्यात आली होती. मात्र, आता रवींद्र जडेजाचं दुखणं बळावल्यामुळे आता त्याला टी-20 वर्ल्डकपमधूनही विश्रांती देण्यात आली आहे.
न्यूज एजन्सी पीटीआयच्या वृत्तानुसार, रवींद्र जडेजाच्या गुढघ्यावर लवकरच सर्जरी करण्यात येणार आहे. त्यामुळे तो आता अनिश्चित काळासाठी मैदानावर दिसणार नाही. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, जडेजाला या दुखण्यातून बरे होण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे त्याला आता टी-20 वर्ल्डकपला देखील मुकावे लागणार आहे.