Tuesday, November 25, 2025
Homeकोल्हापूरKolhapur : गॅस सिलेंडरच्या गाडीचा टायर फुटल्याने पुणे- बंगलूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

Kolhapur : गॅस सिलेंडरच्या गाडीचा टायर फुटल्याने पुणे- बंगलूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

ताजी बातमी ऑनलाईन टीम


घरगुती गॅस सिलेंडरची गाडी बंद पडल्यामुळे पुणे- बंगलूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली. हि घटना सांगली फाट्याजवळ महामार्गावर रविवारी सायंकाळी पाच वाजता घडली.


याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिरोली कडून कोल्हापूरकडे घरगुती गॅस सिलेंडरचा टेंपो जात होता. त्या टेंपोचा टायर फुटल्याने तो रस्त्यावर बंद पडला. दरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कार चालकाने गाडीचा वेग अचानक कमी केला. त्यामुळे पाठीमागून आलेल्या दुसऱ्या गाडीची धडक बसली. अशा अनपेक्षित घडलेल्या तिहेरी घटनेमुळे पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाली. याची माहिती समजताच वाहतूक पोलीस सुरेश कांबळे व मेतके हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महामार्गावरील सर्व वाहने नागाव फाट्याकडे परत पाठवली. पण वाहन चालकांनी आपली वाहने नागाव फाट्याकडे न घेता महाडिक बंगल्या शेजारी असलेल्या रस्त्यावरून सेवा मार्गावर घेण्याचा प्रयत्न केला.



यामुळे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गाडी मागे पुढे घेण्यावरुन अनेक वाहन चालकांच्यात वादाचे प्रसंगही घडले. अखेर वाहतूक शाखेचे पोलिस सुरेश कांबळे व मेतके यांनी येवून वाहतूक सुरळीत केली.
पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग हा अनेक राज्यांना जोडणारा दुवा आहे. पण या महामार्गावर वाहनांचे लहान मोठे अपघात घडताच वाहतूक ठप्प होते. यामुळे वाहतूकदारांना व प्रवाशांना मोठी किंमत मोमी लागते. तरी केंद्रीय रस्ते विकास महामंडळाने तत्काळ सहापट – रस्त्याची बांधणी करावी. अशी मागणी वाहन चालकांच्यातून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -