पत्राचाळ घोटाळा प्रकरणात (PatraChawl Scam) गेल्या दीड महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना नेते (Shiv Sena leader) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जेलमधला मुक्काम (judicial Custody) आणखी आवढला आहे. न्यायालयाने सोमवारी त्यांना पुन्हा 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. राऊत यांची न्यायालयीन कोठडी सोमवारी संपणार होती, मात्र आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने त्यांच्या कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ केली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आता 21 सप्टेंबर रोजी सुनावही होणार आहे.
खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना गिरगाव येथील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (patra chawl scam) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) 31 जुलैला रात्री अटक केली होती. यानंतर 1 ऑगस्टला संजय राऊत यांना कोर्टात हजर केले. त्यानंतर त्यांना 8 ऑगस्टपर्यंत इडी कोठडी पाठवण्यात आले होते. दरम्यान 8 ऑगस्टला न्यायालयात हजर केल्यानंतर पुन्हा राऊत यांची आणखी 14 दिवसांसाठी 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली होती. तेव्हापासून संजय राऊत तुरुंगातच आहेत. संजय राऊत गेल्या दीड महिन्यांपासून कोठडीत आहेत. त्यांना जामीन मिळू नये यासाठी ईडीकडून सुरुवातीपासूनच प्रयत्न सुरू आहेत.
संजय राऊत यांच्यावर कोणते आरोप?
मुंबईतीवल्या गोरेगाव इथल्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी (patra chawl scam case)संजय राऊत यांचा संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. संजय राऊत यांचे भाऊ प्रवीण राऊत यांना एचडीआयएल (HDIL) ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाल्याचा आरोप आहे. त्यापैकी 1 कोटी 6 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले होते. त्याच पैशातून अलिबाग येथे जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप खासदार राऊत यांच्यावर आहे.
तुरुंगात दिवसभर काय करतात संजय राऊत?
खासदार संजय राऊत सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहे. त्यांचा कैदी क्रमांक 8959 आहे. संजय राऊत पहाटेच उठतात. ते दिवसभरातील बहुतांश वेळ वृत्तपत्रे, पुस्तके वाचवण्यात घालवतात. राऊत यांना वही आणि पेन देखील मिळाले आहे. ते लेखनही करतात. परंतु त्यांनी केलेलं लिखाण हे तुरुंगाबाहेर जाणार नाही, याबाबत तुरुंग प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेतली जात आहे.




