Monday, February 24, 2025
Homeतंत्रज्ञान‘या’ कंपनीकडून मिळतोय 5 जीबी डेटा फ्री, फक्त ‘हे’ काम करावं लागेल..

‘या’ कंपनीकडून मिळतोय 5 जीबी डेटा फ्री, फक्त ‘हे’ काम करावं लागेल..

मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांत टेलिकाॅम कंपन्यांमधील स्पर्धा कमालीची वाढलीय. त्यामुळे ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी टेलिकाॅम कंपन्यांकडून विविध सेवांचे दर कमी केले आहेत. त्यात ‘भारती एअरटेल’ ही कंपनीही मागे नाही. आपल्या ग्राहकांसाठी ‘एअरटेल’कडून शानदार प्लॅन्स आणि ऑफर्सही दिले जात आहेत.

आपल्या ग्राहकांसाठी ‘एअरटेल’ने पुन्हा एकदा जबरदस्त ऑफर आणली आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना 5 जीबी डेटा पूर्णपणे मोफत देण्याची घोषणा केली आहे. ‘एअरटेल’च्या 5 GB डेटा फ्री ऑफरचा फायदा घेण्यासाठी युजर्सना नेमकं काय करावं लागेल, हे सविस्तर जाणून घेऊ या..!

‘एअरटेल’च्या मोफत ऑफरबाबत…

‘एअरटेल’च्या नवीन ग्राहकांसाठी ही ऑफर सादर करण्यात आली आहे. या ग्राहकांना 5 GB मोफत डेटा दिला जाणार आहे. त्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे, ग्राहकांना ‘एअरटेल’चे नवीन कनेक्शन घ्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ‘एअरटेल थॅंक्स’ (Airtel Thanks) हे अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल.

‘एअरटेल थॅंक्स’ अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर नवीन ‘एअरटेल’ नंबरसह त्यावर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला ‘एअरटेल थॅंक्स’ अ‍ॅपमध्ये दिलेल्या ‘My Coupons’ सेक्शनमध्ये 5 कुपन्स दिसतील. त्यातील प्रत्येक कूपन हे 1 GB डेटाचे असेल. अशा एकूण 5 कूपनाद्वारे तुम्हाला मोफत 5 GB डेटा मिळणार आहे.

‘एअरटेल थॅंक्स’ अ‍ॅपवर ‘लॉग इन’ करताच हा लाभ दिला जाईल. या डेटा व्हाउचरचा लाभ 90 दिवसांसाठी वैध असणार आहे. या फ्री डेटाशिवाय तुम्हाला या अ‍ॅपद्वारे पैसे कमाविण्याचीही संधी मिळणार आहे. प्रत्येक यशस्वी रेफरलवर ‘एअरटेल’ ग्राहकास 100 रुपये मिळणार आहेत.

‘एअरटेल थँक्स’ अ‍ॅपमध्ये युजर्सना आपल्या मित्रांना ‘एअरटेल प्रीपेड सिमकार्ड’साठी रेफरल पाठवू शकतात. संबंधित व्यक्तीने लिंक वापरून ‘एअरटेल’चे नवीन सीम कार्ड खरेदी केले, तर दोन्ही ग्राहकांना 100 रुपयांचे डिस्काउंट कूपन दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले..

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -