Thursday, December 18, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना बेड्या;17 लाखाचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर ; घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना बेड्या;17 लाखाचा मुद्देमाल जप्त


-कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई-


घरफोडी चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोन आरोपींना पकडून त्यांच्याकडून चोरीच्या 2 व चोरी करणे करीता वापरलेली 1 अशा एकूण तीन इको गाड्या व घरफोडीतील साहित्य असा एकूण 17,00,000/- (सतरा लाख) रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केले असून एकूण चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदरची कारवाई
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांच्या पथकाने केली.


सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मालाविरुद्धचे गुन्ह्यांमध्ये वाढ झालेने मा.पोलीस अधीक्षक, श्री.शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांना जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविरुद्धचे गुन्ह्यांचा समांतर तपास करणे बाबत आदेशित केले होते. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथके नेमूण सक्त पेट्रोलींग करुन गोपनीय व तांत्रिकरित्या माहिती काढून रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करुन घडणारे गुह्यांना प्रतिबंध करुन घडलेले गुन्हे उघडकीस आणणेकरीता योग्य ते मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.


पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, आजरा पोलीस ठाणे, गु.र.नं.142/2022, भा.द.वि.स.क.379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरलेली मारूती कंपनीची इको गाडी क्र.एमएच-09-एफक्यु-0385 ही घेवून दोन इसम कोल्हापूर ते कागल जाणारे एनएच-4 हायवेवरील कणेरी फाट्यावर येणार असले बाबत माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सहा.पोलीस निरीक्षक किरण भोसले, पोलीस अमंलदार रणजित पाटील, प्रशांत कांबळे, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, रणजित कांबळे, विनोद कांबळे, आसिफ कलायगार व अनिल जाधव यांचे तपास पथकाने कोल्हापूर ते कागल जाणारे एनएच-4 हायवेवरील कणेरी फाट्यावर सापळा लावून संशयित आरोपी ईश्वरसिंह रणवीरसिंह राजपूत,( वय 30 जुनसवाडा, माम, नॉर्थ गोवा मुळ गाव-जुनी बाली, ता.बागोडा, जि.जालोर, राज्य-राजस्थान व कृष्णकुमार राणाराम देवासी, (वय 27 रा.करासवाडा, चार रास्ता, म्हापसा, गोवा मुळ गांव-हरटवाव, ता.गुड्डामालानी, जि.बाडमेर, राज्य-राजस्थान) यांना त्यांचे कब्जातील इको गाडी क्र.एमएच-09-एफक्यु-0385 सह पकडले.


सदर आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदारांसह मिळुन आजरा, गांधीनगर व करवीर पोलीस ठाणेचे हद्दीत घरफोडी चोरी तसेच इको गाड्या चोरीचे गुन्हे केलेची माहिती सांगितलेने आरोपींचे माहितीने त्यांचे कब्जातील चोरलेली इको गाडी क्र.एमएच-09-एफक्यु-0385 एक तसेच आणखी एक चोरीची इको गाडी व गुन्हे करणेकरीता वापरलेली एक इको गाडी अशा एकूण तीन इको गाड्या तसेच घरफोडी चोरीतील साहित्य असा एकूण 17,00,000/- (सतरा लाख) रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नमुद आरोपी हे मुळचे राजस्थान राज्यातील असून ते सध्या गोवा राज्यात राहणेस आहेत. ते गोवा येथुन त्यांचे मालकीचे चारचाकी इको गाडीतून रात्रीचे वेळी कोल्हापूर येथे येवून चो-या करुन परत जात असलेचे निष्पन झाले आहे.


आरोपींचे कब्जात आजरा पोलीस ठाणे हद्दी मधील चोरीस गेलेली इको गाडी क्र.एमएच-09-एफक्यु-0385 ही मिळुन आलेने आरोपींना आजरा पोलीस ठाणे येथे हजर करणेची प्रक्रिया सुरु आहे. 


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, श्री.शैलेश बलकवडे व अपर पोलीस अधीक्षक, श्री.तिरूपती काकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा.पोलीस निरीक्षक किरण भोसले, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महादेव कुराडे, अजय गोडबोले, पोलीस अंमलदार रणजित पाटील, प्रशांत कांबळे, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, रणजित कांबळे, विनोद कांबळे, आसिफ कलायगार, अनिल जाधव, संजय पडवळ, संतोष पाटील, रणजित पाटील व सायबर पोलीस ठाणे कडील अमर वासुदेव, सुरेश राठोड, अजय सावंत, सचिन बेंडखळे, संदीप गुरव, रविंद्र पाटील यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -