ताजी बातमी ऑनलाईन टीम
पॉप्युलर फ्रंन्ट ऑफ इंडिया(पीएफआय) या राजकीय संघटनेच्या मिरजेतील पदाधिकाऱ्यास चौकशीसाठी अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री क्राईम ब्रँचचे एक पथक, स्थानीक गुन्हे अन्वेषण व गांधी चौकी पोलीस यांनी ही कारवाई केली आहे. टेरर फंडिंगच्या माध्यमातून पीएफआय काम करीत असल्याचा संशय असल्याने त्यामुळेच राज्यात एनआयएकडून छापेमारी सुरू असून त्यात आता मिरजेतील पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरुवात झाली आहे. मिरजेतून एकास ताब्यात घेतले असून चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे. पोलिसही आता अर्लट झाले असून चौकशी सुरू झाली आहे. सदर कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.
सदर पदाधिकाऱ्याच्या तपासात काही संशयास्पद आढळल्यास किंवा पीएफआयच्या माध्यमातून त्याने काही गैरवर्तन केल्याचे निदर्शनास आल्यास योग्य ती कारवाई करू अशी माहिती गांधी चौकी पोलीस ठाण्याचे रविराज फडणीस यांनी सांगितले आहे.








