ताजी बातमी ऑनलाईन टीम
येथील एका अभियांत्रिकी शिक्षणाचे खाजगी क्लासेस
चालवणाऱ्या शिक्षकाने मुलीवर बलात्कार के ल्याची घट ना उघडकीस आली आहे. येथील गल्ली नंबर सहा राजीव गांधी नगर मधील बसाप्पा विठ्ठल करलट्टी (वय ३५) असे नराधम शिक्षकाचे नाव आहे.
याबाबत जयसिंगपूर पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, या शिक्षकाचे डिप्लोमा शिक्षणाचे क्लासेस होते. येथील गल्ली नंबर १३ मध्ये मगदूम बिल्डिंगच्या तळघरात तो क्लासेस घेत होता. या ठिकाणी शिक्षणासाठी येणाऱ्या एका मुलीवरती ऑक्टोबर २०१९ ते बुधवार २८ सप्टेंबर २०२२ पर्यंत या शिक्षकाने बलात्कार केला आहे.
दरम्यान पोलीस तपासामध्ये आणखीन घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणखीन मुलींच्या बाबतीत ही बलात्कार झाल्याचे समजून येत आहे. पिडीत मुलीचे अश्लिल चित्रफिती बनवून बदनामी करण्याची धमकी देऊन तो त्या मुलीला वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी धमकी देत होता. जर शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर या चित्रफिती सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता. दरम्यान आज फिर्यादी पिडित मुलीचे नातेवाईक जयसिंगपूर येथे येऊन तो घेत असलेले क्लासच्या ठिकाणी गेले.
त्या ठिकाणी या शिक्षकांने त्यांना उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.त्यामुळे पालकांनी त्याला चांगला चोप दिला व त्याला त्या ठिकाणाहून मारत आणन पोलिसात हजर केले. पोलिसांनीही आपला खाक्या दाखवल्यानंतर त्याने सगळ्या गोष्टी कबूल केल्या . या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून या शिक्षकाविषयी संतप्त भावना निघत आहेत. समाजामध्ये गुरु आणि शिष्याचे पवित्र नात असताना असले कृत्य केल्यामुळे या शिक्षकाविषयी शिक्षण क्षेत्रामध्येही खळबळ माजली आहे . दरम्यान, पीडित मुलीच्या पालकांनी त्याला जयसिंगपूर पोलिसात आणल्यानंतर पोलिसांनी त्याच्या बॅगेची तपासणी केली त्यामध्ये पोलिसांना कंडोमची पकिटे मिळून आली.
दरम्यान, अशा घटनांमळे शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या नराधमावर कारवाई करून कडक शिक्षा करावी अशी मागणी पालकांतून तसेच नागरिकांतून होत आहे. या घटनेने शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पालकवर्गात चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासत घणास्पद कृत्य करणाऱ्या अशा खाजगी शिक्षकांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणीही होत आहे. या प्रकारामुळे खाजगी क्लासेसमध्ये मुलांना पाठवावे की नाही असा प्रश्नही पालकांतून होत आहे.