Tuesday, December 16, 2025
Homeक्रीडाभारताची दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट्सनी मात! मालिकेत 1-0 अशी आघाडी

भारताची दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट्सनी मात! मालिकेत 1-0 अशी आघाडी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

अर्शदीप सिंग, दीपक चहर आणि हर्षल पटेलची धारदार गोलंदाजी आणि नंतर के एल राहुल (51*) आणि सूर्यकुमार यादव (50*) यांच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला. या विजयासोबतच भारताना तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. तिरुअनंतपुरममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 107 धावांचं माफक लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य भारतीय संघानं 20 चेंडू बाकी (IND vs SA T20I Series) असताना केवळ दोन विकेटच्या मोबदल्यात पार केले.



तत्पूर्वी या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खूपच खराब झाली. अर्शदीप सिंग आणि दीपक चहर यांच्या धारदार गोलंदाजीसमोर आफ्रिकेचा अर्धा संघ पहिल्या 15 चेंडूत बाद झाला. आफ्रकेने केवळ 9 धावांत आपल्या सुरुवातीच्या 5 विकेट गमावल्या. यातील चार फलंदाजांना तर त्यांचे खाते देखील उघडता आले नाही. त्यानंतर अॅडम मार्करम (25), वयान पार्नेल (24) आणि केशव महाराज (41) यांनी संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -